राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांचा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 21 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुतारवाडी गीताबाग येथे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री कु. अदिती तटकरे, श्री. मधुकर पाटील, श्री. विनोद पाशिलकर, श्री. मोतीराम तेलंगे, श्री.सुरेश महाबळे, श्री. दया पवार, श्री. शिवराम शिंदे, श्री.किसन मोरे, श्री. नंदकुमार म्हात्रे, श्री. लक्ष्मण महाले, श्री. जयवंत मुंडे तसेच तालुका कमिटी अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, पक्ष पदाधिकारी व विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुनिल तटकरे यांनी सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले. पक्ष वाढीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे त्यांनी अवाहन केले. आपल्या सत्काराने भारावून गेल्याची व नवीन उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया अनेक नवनियुक्त सत्कारमुर्तींनी दिली.