मोतीराम मोरे यांचे दुःखद निधन
इंदापूर (संतोष मोरे) : रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील वाशीहवेली गावचे सुपुत्र मोतीराम कानू मोरे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी विरार येथे गुरुवार दि.१४/०१/२०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एकत्र कुटुंब पद्धत त्यांनी आजपर्यंत जपली आहे. त्यांच्या पश्चात चार भाऊ आणि तीन बहिणी व त्यांची पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. घराचा मेन खांबा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या गावात तालुक्यात आणि विरार येथे राहतात त्या सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक व धार्मिक कामात हिरहिरीने भाग घेणे, सोसायटीतील पाण्यापासून सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, कुणाची निंदा न करणे, सगळ्यांना चांगला मार्ग सांगणे अशी प्रेमळ मनमिळवू व्यक्ती निघून गेल्याने कधी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशा होतकरू दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दि. २४/०१/२०२१ रोजी जलदान विधी व शोक सभेचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. पत्ता : ३०२, लंबोदर अपार्टमेंट, मांदारेश्वर नगर, रामू कम्पाऊड, गणपती मंदिर जवळ, पारस हॉस्पिटलच्या मागे विरार (पूर्व) मुंबई.