सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्टकडून अशोकदादा साबळे विद्यालयास पाच लाखांची मदत
तळा (संजय रिकामे) : ३ जूनच्या चक्रीवादळामुळे माणगांव येथील अशोकदादा साबळे विद्यालयातील चाळीस संगणक तसेच फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नाना पालकर स्मृती ट्रस्टचे प्रबंधक आणि रायगड भुषण कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नांतून सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्ट मुंबई यांच्याकडून विद्यालयास संगणकासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांना दि.बुधवार दि.२०/१/२०२१ रोजी देण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा गांधी, स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा, मुख्याध्यापक श्री. जाधव, उपप्राचार्य श्री. ढमाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय व माणगांव ज्युनियर कॉलेज हे रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील विद्यालय असून या विद्यालयात १९३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. एक सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नातून सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्ट मुंबई यांच्याकडून पाच लाख रुपयांची संस्थेस आर्थिक मदत केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे यांनी आभार मानले.