🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत नेत्रा फराडे द्वितीय 

माणगांव (राजन पाटील) : छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची नेत्रा हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. विभागवार स्पर्धा अभिनव ज्ञांमंदिर ऊसर खुर्द विद्यालयात संपन्न झाली होती. विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांची अंतिम स्पर्धा कल्याण येथे संपन्न झाली. या स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची विद्यार्थिनी नेत्रा फराडे हीने इयत्ता आठवीच्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या स्पर्धेत आठवी साठी व्यायामाचे महत्व, नववीसाठी रोग प्रतिकारक शक्ती व आरोग्याचे महत्व  व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण माझे अनुभव हे विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत विद्यार्थी अत्यंत उत्साहाने अभ्यासपूर्ण तयारी करून    सहभागी झाले होते. 

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव, सांस्कृतिक प्रमुख मनोहर पुरी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वृंद तसेच संस्था पदाधिकारी यांनी नेत्राचे अभिनंदन व कौतुक केले. 

Comments

Popular posts from this blog