शिवसेनेचे मिशन नगरपंचायत निवडणूक

बालेकिल्ला असलेल्या तळा शहरात भुमिपूजन, उद्घाटनाचे आयोजन

तळा (संजय रिकामे) : आगामी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीत रायगड मधील नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवीण्यासाठी व्युहरचना आखली असून प्रचाराची सुरवात श्रीवर्धन मतदार संघातील तळा तालुक्यातून केली आहे. त्यासाठी दि.17/1/2021 रोजी तळा नगरपंचायत हद्दीतील गाव वाडी वस्तीवर तब्बल २ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या विकासकामांच्या भुमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता कुंभार आळी पुसाटी तलावापासून विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भुमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या भुमीपूजन सोहळ्यास शिवसेनेचे लोकप्रिय आ. भरतशेठ गोगावले, शिवसेना रायगड संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, शिवसैनिक मोठ्या उपस्थित राहणार आहेत.  

तळा नगरपंचायतीवर पुन्हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली असून विकासकामांचा राष्ट्रवादी काँग्रेस पॅटर्न वापरुन त्यांनी तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसवरच मात केली आहे. तब्बल २ कोटी ५३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन शिवसेनेने प्रत्येक प्रभागात कामेे दिली आहेेेत. या विकासकमांमुळे शिवसेनेने मजबूत पकड निर्माण केली आहे. या विकासकामांच्या झंझावातामुळे विरोधकांना येथे संधीच नसल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायतीतील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ तळा तालुक्यातून फुटत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा धसका घेतला आहे. या भुुुमीपूजन सोहळ्यात आ. गोगावले कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार? याकडे कार्यकर्त्यांचे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

२०१५ मध्ये तळा नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यातील दिग्गजांनी या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत रायगडचे माजी खासदार अनंत गीतेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणुक लढवली होती.यामध्ये शिवसेनेचे ११ नगरसेवक विजयी झाले होते. तर राष्ट्रवादी ५, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज केली होती. पाच वर्षात अनेक बदल झाले आहेत. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जिल्हा प्रमुख नवगणे यांनी तुर्तास महाआघाडी संदर्भात कुठलाही आदेश नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. या भुमीपूजन आणि उद्घाटन सोहळ्याने शिवसेने विरोधकांवर मात करत तळा शहरात मजबूत पकड निर्माण केली आहे.  

Popular posts from this blog