नोकरीला लावतो असे सांगून बेरोजगार तरूणीला लुबाडले! 

पोलीस असल्याचे सांगून पैसे लुबाडले 

नवी मुंबईतील भामट्या पोलीसाचा प्रताप? 

रायगड (प्रतिनिधी) : "मी एक पोलीस आहे व माझ्या सर्वत्र चांगल्या प्रकारे ओळखी आहेत. मी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावतो, त्यासाठी ५ लाख रूपये खर्च करावे लागतील!" असे सांगून एका भामट्याने एका बेरोजगार तरूणीकडून प्रथम २ लाख रूपये रूपये व उर्वरित ३ लाख रूपये रक्कम नंतर घेण्याचे ठरले होते. परंतु त्यावर ३ वर्षे उलटून गेली पण नोकरीचा पत्ताच नाही! 

अशा प्रकारे या भामट्या इसमाने सदर तरूणीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सदर तरूणीने खारघर पोलीसांकडे तक्रारही दिलेली आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे संबंधित तरूणीचे म्हणणे आहे. 

विशेष म्हणजे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखेल चौकशी झाल्यास या भामट्याने आणखी किती लोकांना फसविले आहे, हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Popular posts from this blog