ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

तळा (संजय रिकामे) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिनाचा तळा तालुक्यातील शासकीय ध्वजरोहणाचा मुख्य कार्यक्रम 26 जानेवरी रोजी सकाळी ठिक 9.15 वाजता तहसिल कार्यालयाच्या पटांगणात तहसिलदार अण्णापा कनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजरोहण करुन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी तळा तालुक्यातील नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे, उपनगराध्यक्षा सायली खातु,पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, पोलीस निरिक्षक एस.जी.गेंगजे, माजी जिल्हा प्रमुख रवीभाऊ मुंढे, कैलास पायगुडे, चंद्रकांत रोडे, राकेशशेठ वडके, ॲड. निलेश रातवडकर, ॲड. दिव्या रातवडकर ॲड. चेतन चव्हाण, गटविकास अधिकारी व्ही. व्ही. यादव, पत्रकार संजय रिकामे, पुरुषोत्तम मुळे, संध्या पिंगळे, किशोर पितळे, शासकीय अधिकारी कर्मचारी वृंद, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, ज्येष्ठ आणि प्रतिष्ठीत नागरिक, विद्यार्थी आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शासनाच्या नवीन धोरणानुसार 9.10 मिनिटांनी भारताचे संविधान ऊद्देशिकाचे वाचन करण्यात आले. तद्नंतर  पोलीस निरिक्षक एस. जी. गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली परेड सादर करत तहसिलदार कनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. ध्वजरोहण झाल्यानंतर तहसिल कार्यालयात मान्यवरांची छोटेखानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तळा तालुक्यातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच तालुक्यातील विकासकामे आणि अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली तहसीलदार यांनी सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या यावेळी पुन्हा शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog