भिवा पवार यांची शालेय समिती सदस्यपदी नियुक्ती 

माणगाव (राजन पाटील) : शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले श्री. भिवा बळीराम पवार यांची कै. विजया गोपाळ गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राथमिक विभागाच्या शालेय समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. 

वनवासी वाड्यांवर चांगला संपर्क असणारे, जनमानसात सामील होणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे, अन्यायाबद्दल चिड व न्यायाची चाड असणारे झुंजार पत्रकार म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांच्या या सदस्य पदाच्या निवडीमुळे आश्रमशाळा प्रशासनात त्यांची मदत होणार असल्याने संघ परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली धारसे, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संघ परिवारातील अनेक स्तरातून सरांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्याला त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog