विनयभंगाची तक्रार दाखल करून घेण्यास दापोली पोलीसांचा नकार, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : महिलेला अश्लील शिवीगाळ करून, ठार मारण्याची धमकी देऊन तसेच अश्लील वक्तव्य करून साडी-ब्लाऊज फाडून  विनयभंग केल्याची तक्रार दाखल करून घेण्यास दापोली पोलीसांनी नकार दिला. यामुळे अन्यायग्रस्त महिलेने याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

जनता जेव्हा-जेव्ह अडचणीत सापडते, तेव्हा-तेव्हा ती रक्षणासाठी पोलीसांकडेच धाव घेत असते म्हणूनच पोलीसांना 'जनतेचे रक्षक' असे म्हटले जाते. पण जर एखाद्या ठिकाणी जर पोलीसच गुन्हेगारांना साथ देत असतील तर तो 'कुंपणाने शेत खाण्याचा' प्रकार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथील एका महिलेवर झालेल्या अन्यायाबाबतची तक्रार दाखल करून घेण्यास पोलीसांनी नकार दिल्याचा पीडित महिलेचा आरोप असून याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर महिलेकडून करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारांना साथ देणाऱ्या दापोली पोलीसांचीही याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सदर तक्रारीतून करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहता येथे पोलीसांचा धाक संपल्याचे दिसत असून येथे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. 

तक्रार दाखल करण्याचा अधिकार सर्वांना आहे व आलेली तक्रार ही तक्रारदाराच्या शब्दांमध्ये दाखल करून घेणे हे पोलीसांचे कर्तव्य आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस हे त्यांची ड्युटी व्यवस्थित करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आलेले आहे. येथील पोलीसांनी खैर तस्करांशी (गुन्हेगारांशी) संगनमत करून सदर महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सदर महिलेने आपल्या तक्रारीतून केली आहे.

Comments

Popular posts from this blog