कोलाडनजीक बेकायदा खैरतस्करी करणारा टेंपो पकडला, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल!
रोहा (समीर बामुगडे) : वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन फिरते पथक रोहा यांनी विनापरवाना खैर सोलीव मालाची वाहतूक करणारी टाटा ११०९ टेंपो क्रमांक एमएच-०४-डीके-२३८८ मुंबई-गोवा महामार्गावरील पुगांव येथे पकडून खैर तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
यामध्ये आरोपी १) शमसुल हसन खान (वाहनचालक) रा. माहीम (पूर्व), २) जावेद शेख (मालक) रा. डहाणू रोड पालघर ३) तय्यब यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाहनामध्ये खैर सोलीव नग ४०६, घ.मी.६.९६४ किंमत १,०२,५६१/- रूपये टाटा ११०९ टेम्पो वाहन किंमत १०,००,०००/- रुपये जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ,४१(२) (ब), ४२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा इच्छांत कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनपाल फिरते पथक रोहा आर. जी. पाटील, वनपाल खांब मंगेश शेळके, वनरक्षक भगत, देवकांबले, श्री. शिद, श्री. मुळे हे करीत आहेत. तसेच वनरक्षक तपासणी नाका कोलाड श्री. पव्हरे, श्री. राजमाने, वाहनचालक श्री. लोखंडे यांचेही या कारवाईमध्ये सहकार्य लाभले.