🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

भागाड येथील बौद्धवाडी रस्त्याची दुरावस्था 

काँक्रीटीकरण केलेला रस्ता अवघ्या ६ महिन्यातच मातीला मिळाला! 

भागाड/माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील भागाड येथील मुख्य रस्त्यापासून बोद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असूम त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

२ वर्षांपूर्वी या रस्त्याच्या काँक्रीटीकणाचे काम झाले होते. परंतु निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यातच या रस्त्याची वाट लागली व सध्याच्या स्थितीत या रस्त्याची अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नसून हा काँक्रीटीकरणाचा रस्ता आता दगड-मातीच्या स्वरूपात दिसू लागला आहे. या परिसरातील अनेक घरांमधील नागरिक येण्या-जाण्यासाठी या रस्त्याचा नियमित वापर करीत असतात. या रस्त्याचे काम तातडीने होण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातून मागणी होत आहे. 

मात्र या समस्येकडे शासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु विशेष म्हणजे अनेक नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या या रस्त्या काम लवकर करण्याऐवजी दुर्लक्ष करून एका वैयक्तीक घरासाठी नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. येथील ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक कामांमध्ये देखील राजकारण केले जात असल्याचे या प्रकारांतून दिसून आलेले आहे. परिणामी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन येथील रस्त्याचे काम करावे अशी मागणी बहुजन हितकारिणी सभा संस्थापक रविंद्र जाधव यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog