तळा शहरातील सायली लिमकर एल.एल.एम. उत्तीर्ण 

एल.एल.एम. उत्तीर्ण होणारी तालुक्यातील पहिलीच युवती!

तळा (कृष्णा भोसले) : तळा शहरातील सायली जगदीश लिमकर हिने मुंबई युनिव्हर्सिटी येथून एल.एल.एम. उत्तीर्ण होऊन शहरासह तालुक्याचेही नाव उज्वल केले आहे. सायली लिमकर ही एल.एल.एम.उत्तीर्ण होणारी तालुक्यातील पहिलीच युवती आहे. सायलीचे वडील जगदीश लिमकर हे आर.डी.सी. बँकेत काम करीत असून मोठी बहीण डॉ. गायत्री लिमकर डेंटिस्ट आहे. लहानपणापासून अभ्यासाची आवड तसेच वक्तृत्व उत्तम असल्याने सायलीने एल.एल.बी. ला प्रवेश घेतला. मुंबई चर्चगेट येथे आपली एल.एल.बी. पूर्ण करून मुंबई युनिव्हर्सिटीतुन एल.एल.एम. ची तयारी सुरू केली व अथक परिश्रम व आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सायलीने एल.एल.एम. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. तिची अभ्यासाबद्दलची जिद्द आणि कौशल्य पाहता तालुक्यातील तरुणींना नक्कीच तिचा आदर्श घेण्यासारखा आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog