'प्रांत ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे ग्राहकांची विश्वासार्हता जपणारी संस्था' - राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांचे प्रतिपादन

रोहा येथे प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेची कार्यकारिणी जाहीर

रोहा (रविना मालुसरे) :

रोहा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे ग्राहक संरक्षण प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर गोविंद काळे यांची तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी जगदिश घरत यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष म्हामुणकर, दिल्ली प्रदेश अध्यक्ष अण्णा डांगर, राष्ट्रीय महासचिव उत्तम भाऊ मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण खुळे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख मनोजभाई घोसाळकर, नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे : पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश विचारे, राष्ट्रीय महासचिव श्याम सुंदर चौधरी, रुपेश जामकर महाराष्ट्र उपाध्यक्ष, दक्षिण जिल्हाध्यक्ष गोविंद काळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष जगदीश घरत दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष विजय लिमकर यांची निवड करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला आदी मान्यवर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मनोजभाई घोसाळकर यांनी केले. यावेळी मनोजभाई घोसाळकर म्हणाले की, भविष्यात प्रांत ग्राहक संरक्षण परिषद संस्था चांगल्या प्रकारे काम करेल व रायगड जिल्ह्यात चांगला विस्तार होईल. यासाठी नवनिर्वाचित कार्यकारणीने जास्तीत जास्त मेहनत घेऊन ही संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे जोपासली पाहिजे. 

राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले म्हणाले, की 'जागो ग्राहक जागो' या हेतूने सामाजिक बांधिलकी राखून प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही गेले अनेक वर्षे करत आहोत. रोहा तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आणि ग्राहकांची फसवणूक होत असते प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना फसवणारे अनेक व्यापारी उद्योजक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फसवत असतात त्यासाठी आपल्याला जनजागृती करण्याची गरज आहे. जनजागृतीच्या माध्यमातून आपण आपली संस्था जनसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन भोसले यांनी या कार्यक्रमात केले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष म्हामुणकर यांनीही आपले विचार व्यक्त केले तसेच तसेच उत्तम मोरे, रुपेश जामकर, श्यामसुंदर चौधरी, निलेश विचारे, गोविंद काळे, जगदीश घरत आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Popular posts from this blog