माणगांव पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची माणगांव तालुका प्रेस क्लबकडून सदिच्छा भेट
माणगांव (उत्तम तांबे) :
माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी माणगांव पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्विकारल्यामुळे माणगांव तालुका प्रेस क्लबने पोलीस ठाणे माणगांव येथे जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते.
या पदावर रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार माणगांव पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते पुणे या ठिकाणी सीआयडी खात्यामध्ये प्रमुख म्हणून कार्यरत होते. प्रदीप देशमुख यांची नेमणूक झाल्यावर माणगांव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळेस माणगांव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम तांबे, कार्याध्यक्ष पद्माकर उभारे, खजिनदार संतोष सुतार, माजी अध्यक्ष गौतम जाधव, सदस्य हरेश मोरे उपस्थित होते.