राष्ट्रवादी युवती व युवक काँग्रेसच्या वतीने आदिवासी बांधवाना दिवाळीची अनोखी भेट
'एक करंजी सुखाची' हा स्त्युत्य उपक्रम!
रोहा (रविना मालुसरे) : पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेस तसेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणाचे औचित्य साधून "एक करंजी सुखाची" हा उपक्रम रोहा तालुक्यातील नीवी, लांढर व भुवनेश्वर आदिवासीवाडी येथील बांधवांसोबत त्यांना दिवाळी फराळाचे वाटप, त्याचबरोबर अंधारातून प्रकाशाकडे येण्याच्या दृष्टीने दिव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच १४ नोव्हेंबर 'चिल्ड्रन्स डे' चा योग जुळून आल्याने आदिवासी वाडीतील विद्यार्थी वर्गाला वही, पेन त्याचबरोबर चॉकलेटचे वाटप सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा ॲड. सायली दळवी, त्याचबरोबर रोहा तालुका युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर व ज्यांच्या सहकार्याने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयवंत दादा मुंढे, लांढर ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश भगत, वरसे ग्रामपंचायत उपसरपंच अमित मोहिते, जगदिश भगत, राकेश बामुगडे, पत्रकार राजेंद्र जाधव, रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. अनंत खराडे, रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, रोहा तालुका विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष शंतनु रटाटे, रोहा शहर युवती अध्यक्ष रुचिका जैन, उपाध्यक्ष असावरी मोकल, मयुरी काणेकर तसेच पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.