कोलाड येथील पत्रकारांनी घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची भेट 

रायगड (भिवा पवार) : कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत तायडे यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रोहा पोलीस ठाण्यातून कोलाड पोलीस ठाण्यात बदली होत नवे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी नुकताच पदभार स्विकारल्यानंतर कोलाड येथील पत्रकारांनी त्यांची सदिच्छ भेट घेतली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोलाड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुजू झालेले सुभाष जाधव हे मूळचे वाई सातारा येथील असले तरी त्यांचे बालपण रोह्यात गेले यामुळे त्यांना रोहा तालुक्याचा पूर्णपणे अभ्यास आहे. तसेच त्यांनी पुणे व नाशिक येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कोलाड परिसरातील नागरीक व पत्रकार यांची माझ्या संपर्कात महत्वपूर्ण सहकार्याची साथ असावी असे सांगितले. याप्रसंगी सुतारवाडी येथील पत्रकार हरिचंद्र महाडिक, चिल्हे खांब येथील श्याम लोखंडे, गोवे कोलाड येथील विश्वास निकम, चिंचवली कोलाड येथील भिवा पवार हे उपस्थित होते.

Popular posts from this blog