पाटणूस पंचक्रोशीत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

आशा वर्कर सौ. शारदा म्हामुणकर व सौ. रेश्मा म्हामुणकर यांची कौतुकास्पद कामगिरी! 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :

माणगांव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायत हद्दीत आतापर्यन्त केवळ चार ग्रामस्थ कोरोना पॉझिटीव्ह झाले होते. ते पूर्ण बरे होऊन घरी आल्यानंतर मात्र गावात एकही ग्रामस्थ कोरोना ग्रस्त झाला नाही. ग्रामस्थ आपआपल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात येताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास पाटणूस ग्रामपंचायत ने पाठिंबा देत "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या अभियानास सुरुवात केली. या अभियानात आरोग्य विभागाच्या दोन आशा वर्कर सौ. शारदा म्हामुणकर व सौ. रेश्मा म्हामुणकर यांनी पाटणूस पंचक्रोशीत घरोघरी जाऊन कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन लेवल तपासून घरात कुणी आजारी आहे का? किंवा कोरोनाची लक्षणे दिसतात का? याची खातरजमा केली. सुदैवाने पाटणूस पंचक्रोशीत त्यांना एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्याच्या रणरणत्या उन्हात जबाबदारीने काम केल्याने ग्रामपंचायतीकडून व आरोग्य विभागाकडून या दोन आशा वर्कर यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. 

आम्ही घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी केली हे जरी खरे असले तरी जी माहिती आम्हाला मिळाली ती आम्ही साध्या वहीवर नोंद केली होती. ती सर्व माहिती ऑनलाईन भरावी लागते. ती भरण्यासाठी आम्हाला रा.जि.प. शाळेच्या शिक्षकांनी मदत केल्यानेच आमचे काम आणखी सुलभ झाले असे आशा वर्कर यांनी सांगितले.

Popular posts from this blog