माणगांव येथून मोटारसायकलची चोरी 

माणगांव (प्रतिनिधी) :

माणगांवमधील नाणोरे येथून मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

शुभम राजेंद्र नागेश (वय 26) रा. माणगांव रेल्वे स्टेशनसमोर, नाणोरे, ता. माणगांव यांच्या राहत्या घरासमोरून हिरो होंडा कंपनीची निळ्या-काळ्या रंगाची 12000 रू. किंमतीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र. MH06 BH9707 ही घराच्या बाहेरील शेडमधून कुणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेली. त्यानंतर शेजारील परिसरात व गावामध्ये शोध घेतला असता ती आढळून आली नाही. सदर मोटारसायकलचा चेसिस नं. MBLHA10AWDHG11418 व इंजिन क्र. HA10ENDHG25425 असा असून समोरील शो वर 'श्री करंजेश्वरी देवी प्रसन्न' असे रेडियममध्ये लिहीलेले असून तेथे हनुमानाचे चित्र आहे. 

याप्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Popular posts from this blog