रेवदंडा पोलीसांच्या दामिनी पथकामुळे झाली बाप लेकीची भेट 

रेवदंडा : दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदार कर्तव्यास असणारे पोलीस हवालदार प्रमोद देसाई यांना रेवदंडा बाजारपेठ येथून एका ग्रामस्थांने फोनद्वारे कळविले की, एकम नोरूग्ण मुलगी ही रेवदंडा बाजारपेठेत फिरत आहे व तिला कोणी काही विचारायास गेले असता, ती कोणाचे काहीएक ऐकत नसून आक्रमक झालेली आहे व ती तिच्या जवळ असलेल्या वस्तूंची फेकाफेक करीत आहे. ही माहिती मिळताच ठाणे अंमलदार यांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाणे येथील दामिनी पथक/ बडीकॉप कर्तव्यास असणाऱ्या महिला पोलीस नाईक अभियंती भगवान मोकल व महिवला पोलीस नाईक अनुष्का आशिष पुळेकर यांना रेवदंडा बाजारपेठ येथे रवाना केले. पारनाका येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार सुनिल शिंदे, दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांनी सदर मनोरूग्ण मुलीची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला पोलीस कर्मचारी यांना पोलीस गणवेशात पाहून सदर मनोरूग्ण मुलगी आणखी जास्त आक्रमक झाली व तिचे अंगावर परिधान केलेले कपडे स्वतःच फाडण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी ह्या आळीपाळीने आपले पोलीस गणवेश बदतून साध्या वेशात तेथे आल्या व त्या मनोरूग्ण मुलीला विश्वासात घेवून त्यांनी तिची प्रेमाने विचारपूस केली. परंतु तिने काहीही उपयुक्त माहिती सांगितली नाही. सदर मनोरूग्ण मुलीने तिच्या पिशवीतील फेकलेले सामान दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांनी गोळा केले त्यामध्ये त्यांना तिचा मोबाईल व कपडे सापडले. सदर मनोरुग्ण मुलीसोबत दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांनी गोड बोलून तिला विचारपूस करण्याकरिता रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल जैतापूकर यांनी दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांस मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे महिला कर्मचारी यांनी सदर मनोरूग्ण मुलीला पोलीस ठाण्यातील महिला कक्ष येथे नेवून. तिला नाष्टा देवून तिला विश्वासात घेऊन तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता, तिच्या नाव-गावाची विचारणा केली असता तिने काहीएक माहिती सांगितली नाही. सदर मनोरूग्ण मुलीकडील सापडलेला मोबाईल चार्जिंग केला व त्यामधून मुलीच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक शोधून काढला व त्यांना फोन करून हा मोबाईल कोणाचा आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा मोबाईत माझी मुलगी अंकिता हिचा आहे असे सांगून त्यांचे नाव जगन्नाथ चाया पाटील, रा. वरवटणे, नागोठणे असे सांगितले. 

त्यावर दामिनी पथक यांनी त्यांस ओळख सांगून मनोरूण मुलीबाबत चौकशी केली असता त्यांनी माझी मुलगी अंकिता ही काही महिन्यांपासून मनोरूगण झाली आहे व ती आज सकाळी ०४.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही घरातील सर्व माणसे झोपलेलो असताना घरात कोणाला काहीएक न सांगता तिचे कपडे व मोबाईल घेवून निघून गेली आहे. आम्ही तिच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा मोबाईल बंद आहे. आम्ही अंकिता हिचा सगळीकडे शोध घेतला परंतु ती काही सापडली नाही असे सांगितले. त्यावर दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांनी मनोरूग्ण मुलीच्या वडीलांना दिलासा दिला व त्यांची मुलगी अंकिता ही रेवदंडा पोलीस ठाण्यातील महिला कक्ष येथे सुरक्षित आहे. आपण तिला घेण्याकरिता रेवदंडा पोलीस ठाणे येथे या असे सांगण्यात आले.

सदर मनोरूग्ण मुलगी अंकिता हिचे वडील रेवदंडा पोलीस ठाण्यात आले असता पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल जैतापूकर व दामिनी पथकातील महिला पोलीस नाईक अभियंती भगवान मोकल व महिला पोलीस नाईक अनुष्का आशिष पुळेकर यांनी अंकिताच्या वडिलांकडे योग्य ती चौकशी करून सदर मनोरूग्ण मुलगी अंकिता ही त्यांची मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर तिला सुखरूप तिच्या वडिलांचे ताब्यात दिले. रेवदंडा पोलिसांच्या या कार्यामुळे मनोरूग्ण मुलगी अंकिता हिचे वडील यांनी रायगड पोलीस दल, रेवदंडा पोलीस ठाणे व दामिनी पथक यांचे मनापासून आभार मानले.


Popular posts from this blog