निर्मूलन अतिक्रमण पथकाने खैर तस्करीचा केला पर्दाफाश!
रोहा (समीर बामुगडे) : जंगलतोडीवर अंकुश ठेवण्याचे काम शासनाच्या वनखात्याने करायचे आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तैनात करणयात आलेले आहेत. मुरुड तालुक्यात खैराची वृक्षतोड होत असणाऱ्या परिसरातील नागरिकाना संपर्कात राहण्यासाठी वनविभागाकडून हेल्पलाईन १९२६ वरून कळवून अधिकारी यांना माहिती दिली की निर्मूलन अतिक्रमण पथकाचे वनक्षेत्रपाल व फिरते पथक रोहा ईच्छात कांबळी यानी बेकायदेशीर खैरची वाहतुक करणारी बोलेरो पिकअप गाडी ताबंडी चेका नाक्यावर पकडून खैर तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
आरोपी कृपेश चव्हाण, सुनिल चव्हाण, (रा. राणेचीवाडी) निरज जस्वाल (गाडी चालक-मालक) बेकायदेशीर खैरची तोड करणारा अमित शेळके (रा. आदाड, मुरुड) यांनी उसडी, मणेर, वडघर, नांदगाव, मुरुड या परिसरात खैराची बेकायदा तोड केली असून ९ लाख रूपये किंमतीची पिकअप गाडी, ८ हजार ३०० रू. किंमतीचा सोलीव खैर लाकूड जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियन १९२७ चे कलम (२६)(१)(फ)४२)(४३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वनपाल विजय कोसबे, वनरक्षक फिरते पथक अजिंक्य कदम, वनरक्षक सचिन मानकर, वनरक्षक सत्वशिला गोरड, वनरक्षक गोविद माळी, निर्मूलन अतिक्रमण पथकाचे वनक्षेत्रपाल ईच्छात कांबळी याच्या मार्गदशनाखाली वनविभागाची टीम करीत आहे.