'कोव्हीड' कालावधीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांची उल्लेखनीय कामगिरी
खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह
नागोठणे :
कोव्हीड कालावधीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अविनाश म्हात्रे यांनी वाड्या-वस्त्यांवर जावून सर्व जनतेला धीर देत उत्तम औषधोपचार करून उल्लेखनीय कामगिरी केली.
'कोरोना' विषाणूने सर्वत्र थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामामान्यांना मदत करण्याचे बहुमूल्य कार्य डॉ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे. दरम्यान, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा ९ वा वर्धापन दिन संपन्न झाला. या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. चेतन म्हात्रे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
२४ वर्षाचा तरुण डॉक्टर नागोठणेकरांना लाभला हे नागोठणेकरांचे भाग्य आहे. डॉ. चेतन म्हात्रे हे प्रामाणिक व स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ते नोकरी करत आहेत ते समाज सेवेसाठी. त्यांचे आई वडील हे पोलिस सेवेत आहेत त्यामुळे त्यांना समाज सेवेची आवाड निर्माण झाली. भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बी.ए. एम. एस पदवी संपादन करुन ते डाॅक्टर झाले व नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्तम सेवा दिली असून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. डॉ. चेतन म्हात्रे यांनी प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला देऊन पुढील कार्यवाहीसाठी आपल्या परीने मदत केली. त्यामुळे नागोठणे परिसरात या तरुण होतकरु डॉक्टरचे सर्वत्र कौतुकच होत आहे.