सुनिलजी तटकरे साहेब पुण्याई तुमच्या गाठीशी, जनता तुमच्या पाठीशी
- युवती जिल्हाध्यक्षा सायली दळवी
रोहा (रविना मालुसरे) :
रायगड व रत्नागिरी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब अगदी कठीण काळात रायगडच्या जनतेमध्ये एक कुटूंब प्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूबरोबरच कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते पूर्ण रायगड व रत्नागिरी फिरले. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आला. नुकतीच त्यांनी कोरोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे सर्वत्र जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सुनिलजी तटकरे ह्या आजारातून पूर्णतः मुक्तता व्हावी याकरिता कालिकादेवी मंदिर, कडापे येथे जाऊन देवीची ओटी भरली व उत्तम आरोग्यासाठी देवीकडे प्रार्थना युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व युवक काँग्रेसच्या नेते वर्गाने केली.
यावेळी रायगड जिल्हा युवती अध्यक्षा अॅड. सायली दळवी, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसवते, जिल्हा युवक सचिव अनंत खराटे, माणगाव तालुका युवक अध्यक्ष रुपेश तोडकर, महाड युवक विधानसभा अध्यक्ष सोनल उतेकर, महाड तालुका युवक अध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष प्रशांत खोपकर, युवती अध्यक्षा कु. लाजरी जाधव, युवक सरचिटणीस बाळा सकपाळ, सागर काते, लोणेरे अध्यक्ष अक्षय अंधेरी, सिद्धांग देसाई, जयेश डाकवी, शुभम शेठ, शिवा घाग, महेश शिर्के, पोलादपुर युवक अध्यक्ष तांबे, श्रीवर्धन युवक अध्यक्ष सिद्धेश कोजबे, घनशाम पवार उपस्थित होते.
यावेळी रायगड जिल्हा युवती अध्यक्षा अॅड. सायली दळवी यांनी विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्यातील जनतेचे कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याचे एक कुटूंब म्हणून प्रमुख मोलाची जबाबदारी पेलून सर्वाना हक्काचा मदतीचा हात दिल्याने अनेकांना या काळात साहेबांच्या रुपाने मोठी मदत मिळाली. या काळात साहेबांनी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता जनतेसाठी निस्वार्थीपणे काम केले, परंतु साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न केल्याने साहेबांना कोरोनाची लागण झाली असून साहेबांची कोरोनातून लवकर लवकरात मुक्ती व्हावी यासाठी आम्ही सर्व युवक काँग्रेसच्या वतीने कालिकादेवी मंदिर, कडापे येथे देवीची पुजा अर्चा करीत देवीला साकडे घालत साहेबांना कोरोना मुक्त लवकर कर अशी प्रार्थना केली. जेणेकरून साहेब पुन्हा रायगडकरांच्या सेवेत लवकरात लवकर येऊन अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि सर्वसामान्यांना हक्काचा लोकप्रतिनिधी पुन्हा सेवेत मिळेल, असे मत जिल्हा युवती अध्यक्षा अॅड. सायली दळवी यांनी व्यक्त केले.