सर्पमित्र सलीम सय्यद यांनी १० फूटी अजगराला दिले जीवदान
रायगड (भिवा पवार) :
रोहा तालुक्यातील पुई गाव येथील अनंत लहाने यांच्या घराजवळ एक दहा फूटी लांब अजगर ठाण मांडून बसला होता. हे येथील नागरिकांच्या लक्षात आले असता त्यांनी सर्पमित्र सलीम शब्बीर सय्यद याला फोन करुन बोलवून घेतले व सर्पमित्र सलीम सय्यद यांनी या अजगराला पकडून जंगलात सोडून दिले.
कोलाड जवळील पुई गावातील अनंत लहाने यांच्या घराजवळ एक दहा फूट लांब अजगर ठाण मांडून बसला होता. हे येथील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी त्वरित सर्पमित्र सलीम सय्यद याला फोन करून बोलावून घेतले. घटनास्थळी त्वरित सलीम सय्यद उपस्थित होऊन प्रसाद गायकवाड, अनिकेत शिर्के व संतोष दिवेकर यांच्या सहकार्याने या अजगराला पकडून जंगलात सोडून दिले.
सद्या सापाची संख्या दुर्मिळ होत चालली असल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे साप वाचविण्यासाठी सर्पमित्र पुढे येत आहेत. याप्रमाणे सर्पमित्र सलीम शब्बीर सय्यद यांनी विविध जातींचे साप पकडून जंगलात सोडून देवून त्यांना जीवदान दिले आहे.