रोहेकरांच्या मागणीला पालकमंत्री अदिती तटकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद 

ऑक्सिजन टँक व रक्त साठवणूक केंद्राचे उद्धघाटन

रोहा (रविना मालुसरे) : 

मागील काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाने उच्छाद मांडलेला आहे. रायगड जिल्ह्यात उपचार सुरू असताना ऑक्सिजन पुरवठ्याअभावी मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडा खूप मोठा आहे. अशातच वेळेत रक्तपुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सहाजिकच ऑक्सिजन व रक्तपुरवठा हा रोहेकर नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे.

त्यामुळेच रोहेकर नागरिकांनी आपल्या या ज्वलंत समस्येवर आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधी अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. कार्यतत्पर पालकमंत्र्यांनी तातडीने चक्रे फिरवली. त्याचाच परिपाक म्हणून आज ड्युरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक यंत्रणा व रक्त साठैवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.

कार्यक्रमासाठी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रांताधिकारी यशवंत माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, उपनगराध्यक्ष  महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, आरोग्य सभापती अहमद शेख दर्जी, पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे तसेच मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, विजय मोरे, महेंद्र गुजर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. रक्तपुरवठ्याच्या कमतरतेमुळे यापुढे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होईल अशी अपेक्षा आहे. तथापि सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत हॉस्पिटल हीच रोहेकरांची खरी गरज आहे. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे याबाबतची घोषणा कधी करणार याकडे रोहेकर जनतेचे लक्ष लागले आहे.

उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकिता मते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे, डॉ. देशमुख, डॉ. गोमसाळे, डॉ. आदिती जोगळेकर, डॉ. प्रथमेश बुधे, डॉ. सलमा मुकादम, तसेच सिस्टर इन्चार्ज म्हात्रे, शेवडे, बुधे, ब्लड बँक लॅब टेक्निशियन व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog