जुनी पेन्शन हक्क संघटना माणगांव शाखेची सभा संपन्न
रायगड (भिवा पवार) :
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासकीय सेवेत लागलेल्या खाजगी, अनुदानित माध्यमिक, शाळेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली, यामुळे रायगडसह संपूर्ण राज्यात जुनी पेन्शन हक्क संघटना स्थापन झाली आहे. त्याची शाखा माणगाव तालुक्यात निर्माण झाली. पेन्शन संघटनेची नवी कार्यकारिणी व ध्येयधोरणे समजून घेण्यासाठी माणगाव क्रीडा संकुल येथे सदर सभा सोशल सोशल डिस्टन्सचे पालन करून घेण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांचे जी पी एफ बंद करणे, डीसीपीएस ला विरोध करणे, पगार कपात झालेल्या पीएफ खात्याच्या पावत्या घेणे, हिशोब मागणे, त्याचबरोबर एनपीएस नवीन योजनेने विरोध करणे याकरिता ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष लखीचंद ठाकरे, सचिव चंद्रकांत गावंड, खजिनदार जयवंत म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका नवीन कार्यकारिणी स्थापन झाली. त्यामध्ये तालुकाध्यक्षपदी राजन पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश पवार, कृष्णा पानवकर, सचिवपदी विद्याधर जोशी, सहसचिवपदी तुकाराम पाटील, सचिन म्हात्रे, तर खजिनदारपदी बाबासाहेब साळुंखे, विद्या शिर्के, तर सल्लागार म्हणून सुजाता म्हात्रे, अजित शेंडगे यांची निवड करण्यात आली.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत अधिकारी व दिनेश महाडिक यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पानवकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन पांडुरंग उभारे यांनी केले.