कोरोना पाॅझिटिव्ह वाढले, नियम कटाक्षाने पाळा 

वैद्यकीय अधिक्षक डाॅ. प्रदिप इंगोले यांचे आवाहन 


माणगांव (उत्तम तांबे) :

गौरी-गणपती विसर्जनानंतर माणगांव तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. 

दिनांक २८ ऑगस्ट रोजी तपासणी केलेल्या १०६ रुग्णांपैकी ५१ तर २९ ऑगस्ट रोजी ७३ पैकी ३३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, गर्दी करु नये. मास्क, सॅनिटाईजरचा वापर,  वारंवार साबणाने हात धुणे या सारख्या छोट्या छोट्या पण कोरोनाशी लढताना अत्यंत महत्वाच्या सवयी अंगवळणी पाडाव्यात, त्यांचा कटाक्षाने अवलंब करावा असे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.

बहुतांश पाॅझिटिव्ह रुग्ण हे लक्षण विरहित म्हणजेच असिम्प्टमॅटीक आहेत. एकाच कुटुंबातील पाच पाच सदस्य पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत. यापैकी जवळपास सर्वच सर्दी ताप अशी सर्वसाधारण लक्षण असून गंभीर स्वरुपाचे कोणीही नाहीत. यातील बऱ्याच जणांना घरीच विलगीकरणात तर काहींना बाटू कोव्हिड आयसोलेशन कक्षात ॲडमिट केले आहे. व दैनंदिन आलेल्यांची तपासणी योग्य रितीनी सुरु आहे. त्यामुळे अजूनही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन काटेकोर पणे करावे असे आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात आले आहे.

माणगांवकर जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही कारण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ % इतके असून ही समाधानाची बाब आहे. दुर्दैवाने जवळपास ३ % लोकांचा यात मृत्यू झाला आहे. यासाठीच निष्काळजीपणा न करता संसर्ग टाळणे आपल्या सर्वांचे हाती आहे. हेच योगदान प्रत्येकाने दिले तर ही लढाई येणाऱ्या नजिकच्या काळात जिंकण्यात आपण यशस्वी होऊ आणि उपलब्ध सोयी सुविधा पुरेशा पडून जास्तीजास्त बाधित रुग्णांवर उपचार करण्यात अडचण येणार नाही. जिल्ह्यात २२ हजार ८४५ जणांनी कोरोनावर मात केली. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

हिवाळ्यात जगभरात कोरोनाचा विस्फोट होईल, मृत्यूदर हाताबाहेर जाईल असा धक्कादायक इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ने दिला आहे. भारतात आतापर्यंत २६ लाख ४८ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने १४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३३१ जणांची भर पडली आहे. तर ११ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यूदर हा ३ .१६ टक्क्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४७ हजार ९९५ एवढी झाली आहे.

Popular posts from this blog