कुंडलिका विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांची अनोखी भेट 


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालयाचे निसर्ग चक्रिवादळात खूप नुकसान झाले. विद्यालयातील काही सामानाचेही नुकसान झाले. ही बातमी विद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांना समजली. त्यामुळे विद्यालयाला खास भेट देण्यासाठी १९९५ साली १० वी ची परीक्षा देऊन विद्यालयातून निरोप घेऊन गेलेले माजी विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक मोराळे सरांची भेट घेतली व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रिकाम्या हाती येण्यापेक्षा या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी स्कॅनर, प्रिंटर, ४ सिलिंग फॅन व सॅनिटायझर स्टॅन्ड या वस्तू भेट देऊन शाळेविषयी आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, संचालक यांच्यासह अनेक मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog