पाटणूस, भिरा, विळे परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी. तरीही सरासरी पेक्षा कमी पाऊस 



पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे परिसरात एक जुलै पासून तुफान पर्जन्य वृष्टी होत आहे. त्यामुळे या परिसरातील ओढे, नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. गतवर्षी जून महिन्यात 2000  मी. मी. च्या वर पावसाची सरासरी पोहचली. परंतु यावर्षी जून महिन्यात मान्सून वेळेवर न पोहोचल्याने पावसाचे प्रमाण कमी होते. 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या वेळी झालेल्या पावसामुळे अगोदरच पेरणी केलेली भात शेती उगवली तसेच दररोज सायंकाळी न चुकता थोडा तरी पाऊस पडत राहिला. दिवसा ऊन व सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती पूर्ण जून महिन्यात पाहायला मिळाली. असे असले तरी भात शेतीला पूरक पाऊस पडत होता. भात शेती लावणी करण्या योग्य उगवून आली होती. परंतु शेतात पाणी नव्हते व कडक ऊन यामुळे भात लावणीची कामे थांबली होती. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराज्या सुखावला आणि भात लावणीच्या कामाला जोरदार सुरुवात शेतकऱ्यांनी केली. येत्या आठवड्यात शेती लावणीची कामे पूर्ण होतील अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.
गत वर्षी जुलै महिना सुरू होण्या अगोदरच 2000  मी. मी. च्या वर पावसाची सरासरी पोहोचली होती यंदा मात्र 7 जुलै पर्यंत 1200  मी.  मी. इतकीच पावसाची सरासरी झाली आहे.

Popular posts from this blog