मौलाना आझाद संस्थेचा कोविड योद्धा सन्मान ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांना प्रदान 


रोहा (समीर बामुगडे) : बीड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यरत मौलाना आझाद संस्थेचा कोविड योद्धा सन्मान रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांना प्रदान करण्यात आल्याची माहिती सेक्रेटरी सय्यद मिन्हाजोद्दिन यांनी दिली.


मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड जिल्ह्यात व राज्यभरात विविध सेवाकार्य करते. कोरोना काळात या रोगावर जनजागृती कार्य करणाऱ्या राज्यातील मोजक्या संस्था आणि समाजसेवी व्यक्तींना सन्मान देण्यासाठी एक समिती नेमून निवडक व्यक्तींना सन्मानपत्र देताना आम्हाला रायगड जिल्ह्यातील पत्रकार किरण बाथम यांच्या कार्याची माहिती मिळाल्याने हा सन्मान देतांना आम्हाला समाधान वाटत असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे अध्यक्ष सय्यद अजीम, कोषाध्यक्ष शेख कासीम व सहसचिव मिर्झा मोईज बेग यांनी दिली.

कोरोनासाठी पत्रकार म्हणून काम करावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील काही पत्रकार देखील यात संक्रमित झाले. पोलीस, डॉक्टर तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांनादेखील याची लागण झाली आहे. सर्वांनी सावधपणे आपले समाजकार्य करुन कोरोनाविरोधी लढाई जागृतपणे लढावी अशी प्रतिक्रीया किरण बाथम यांनी व्यक्त केली.

Popular posts from this blog