माजी सैनिक वसंत सावरकर यांचे दु:खद निधन


रोहा (समीर बामुगडे) :
रोहा तालुक्यातील निसर्गरम्य अशा घेरासूरगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वैजनाथ गावचे रहिवासी तथा माजी सैनिक वसंत दामोदर सावरकर यांचे १६ जुलै रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यासमयी ते सुमारे ७१ वर्षांचे होते.

आपल्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य केले.भारतीय लष्करी सेवेत त्यांनी संपूर्ण देशभर विविध ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे देशसेवा करुन सन्मानाने सेवानिवृत्त झाले.त्यांनी लष्करी सेवेत आपले आयुष्य व्यथित केल्याने शरीरयष्टी अतिशय मजबूत अशी होती.सर्वाशी प्रेमळपणाने व सहकार्याची भावना ठेऊन वागणारे एक आदर्श माजी सैनिक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.सध्या कोरोना व्हाईरसने जगभर थैमान माजविले असल्याने सामाजिक सुरक्षिततेचे द्रुष्टीने वसंत सावरकर यांच्या अंत्यविधीसाठी सावरकर परिवारातील सदस्य,आप्तस्वकीय व वैजनाथ-खांब ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन त्यांचे अंत्यविधी यथायोग्य पद्धतीने पार पाडण्यात आले.तर माजी सरपंच प्रकाश थिटे व माजी उपसरपंच जनार्दन महाबळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,सुना,नातवंडे,दोन भाऊ असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शनि.दि.
२५ जूलै रोजी वैजनाथ येथे तर अंतिम धार्मिकविधी सोम.दि. २७ जूलै रोजी साईनगर खांब येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Popular posts from this blog