रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीतर्फे अशा वर्कर व विवीध क्षेत्रातील कर्मचारी वर्ग यांचा कोरोना योद्धा सन्मान
रायगड (भिवा पवार) : राष्ट्रवादी पक्षाचे रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण जगासह भारत देशावर व कोरोना विषाणूच्या महामारीचे संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा वर्कर व विविध क्षेत्रातील कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून कोरोना योद्धा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना व्हायरस व नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेचे झालेले नुकसान यामुळे आपल्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून स्वीकारू शकणार नाही, तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, कोरोना व्हायरसमुळे सर्वांनी आपआपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण आहात त्या तेथूनच शुभेच्छा द्या असे वाढदिवसाच्या अगोदर खा. सुनिल तटकरे यांनी सर्वांना आवाहनन केले होते. असे असले तरी जनतेच्या मदतीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा वर्कर व विविध क्षेत्रातील कर्मचारी वर्ग यांचा गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया जाधव व उपसरपंच अंजेली पिंपळकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र जाधव, संदेश कापसे, नथू शिंदे, रुपाली पोटफोडे, रंजिता जाधव, रजनी गायकवाड, संदेश झोलगे उपस्थित होते.
यावेळी ग्रामसेवक गोविंद शिद,पोलीस पाटील सुरेश जाधव, मंगेश कापसे, कल्पेश पिंपळकर, शिक्षक जयेश महाडिक, रंजना गांधारे, किशोर जाधव, अश्विनी पोटफोडे, देवकर मिनाक्षी पोटफोडे, संगीत शिंदे, सुजाता जाधव, धनश्री घरट, अलका जाधव, कविता दोरुगडे, वंदना मोरे, मधुकर कापसे, दिनकर दहिंबेकर, रामचंद्र कापसे, सचिन काटे, महेंद्रपवार, हरिश्चन्द्र पोटफोडे, माधुरी कापसे कोळी व इतर कर्मचारी यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपली जीवाची पर्वा न करता जनतेचे काम केले आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे असे गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संदीप जाधव यांनी सांगितले आहे.