कुंडलिका विद्यालय पाटणूस शाळेचा दहावीचा 100% निकाल
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील कुंडलिका विद्यालय पाटणूस शाळेचा दहावीचा निकाल 100% लागला असून कु. राहुल सुतार 74.60% गुण मिळवून विद्यालयात पहिला आला असून अनुक्रमे कु. प्रियांका शिंदे 73% गुण मिळवून द्वितीय तर कु. राज राजिवडे 71.40% गुण मिळवून तिसरा आला आहे. विद्यालयातून एकूण 12 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी 6विद्यार्थी प्रथम श्रेणी 4विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 2 विद्यार्थी पास श्रेणी मधून उत्तीर्ण झाले आहेत. कुंडलिका विद्यालयात 90% आदिवासी बांधवांची मुले शिकत असून इतर 10% मुले इतर समाजाची आहेत. आदिवासी वाडीतील सर्वच विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची पाटणूसच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हि पहिलीच वेळ असून आदिवासी वाडीत जल्लोष पसरला असून सर्वच स्थरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुंडलिका विद्यालयाचे चेअरमन, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व पालक यांच्याकडून सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.