ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
टाटा विद्यालय भिरा शाळेचा दहावीचा निकाल 100 %


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील पाटणूस पंचक्रोशीतील, इडियन एज्युकेशन दादर मुंबई संस्थेच्या टाटा विद्यालय भिरा शाळेचा दहावीचा निकाल 100 % लागला असून कु. संजोत सुजय चव्हाण ही विद्यार्थिनी 90% गुण मिळवून शाळेत प्रथम आली असून अनुक्रमे कु. माधवी सुनील तांबे हि विद्यार्थिनी 87.40% गुण मिळवून द्वितीय तर कु. सानिका राम देवरुखकर 86.30% गुण मिळवून तिसरी आली आहे. शाळेतून एकूण 19 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी 15 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 1 विद्यार्थी पास श्रेणी मिळवून पास झाले आहेत.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इंडियन एज्युकेशन दादर संस्था, टाटा पॉवर भिरा कंपनी व्यवस्थापन, ग्रामपंचायत पाटणूस सरपंच व सदस्य, टाटा विद्यालय प्रभारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे पालक यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

टाटा विद्यालयातून प्रथमच 61% गुण मिळवून कु. शीतल वालेकर   हि आदिवासी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याने शाळेकडून तिचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular posts from this blog