महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदावर ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती                 


रोहा (समीर बामुगडे) : महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदावर रायगडचे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वैभव विरकर यांनी केली. संघटनेच्या मुंबईतील मुख्यालयात झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.वैभव विरकर तसेच विलास कदम यांनी बाथम यांना नियुक्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देउन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. रोहा, महाड, माणगाव, खोपोली तसेच रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपनी तसेच कामगार क्षेत्रातील परिस्थितीबाबतीत काल छोटेखानी बैठकीत चर्चा झाली.


विद्यमान परिस्थितीत बहुतांश परप्रांतीय कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निघून गेले आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यासाठी प्रथम प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त सरचिटणीस किरण बाथम यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र जनरल कामगार संघटना नोंदणीकृत संघटना आहे. सदर                                                                         

संघटना  औद्योगिक क्षेत्रातील कामगार, इमारत कामगार , लेबर कामगार, बांधकाम कामगार, घरेलु  क्षेत्रातील कामगार, तसेच चित्रपट क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी प्रामुख्याने कार्य करण्यासाठी स्थापित पक्ष विरहीत कामगार संघटना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व कामगारांसाठी अनेक प्रकारच्या  शासकीय योजना आहेत. कामगार वर्ग हा औद्योगिक असो किंवा कोणत्याही व्यावसायिक कंपनी अथवा  व्यवसायाचा कामगार हा व्यवसायाचा मुख्य पाया आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांची त्यांना माहिती देऊन त्यांचे संरक्षण व शासनाकडून तसेच जिथे कामगार काम करतात त्या कंपनी व्यवस्थापनेपासून त्यांना मिळणारी मदत  मिळवुन देणे तसेच कामगारांच्या न्याय व हक्कासाठी  आम्ही महाराष्ट्र जनरल कामगार संघटना स्थापन केली असल्याचे संस्थापक वैभव विरकर व नवनियुक्त सरचिटणीस किरण बाथम यांनी सांगितले.

Popular posts from this blog