धनजीभाई मोदी मेडिकल फौंडेशन व गोका इंजिनियरिंग कं. विळे यांच्या संयुक्त विद्यमाने अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगाव तालुक्यातील धनजीभाई मोदी मेडिकल फौंडेशन व गोका इंजिनियरिंग कं. विळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सणसवाडी आणि ग्रामपंचायत वरचीवाडी परिसरातील ग्रामस्थांना एम्पॉवर आणि इम्युनिटी पॉवर वाढीसाठी अर्सेनिक अल्बम-30 च्या 600 बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. वरची वाडी ग्रामपंचायत चे सरपंच परशुराम कोदे यांच्याकडे गोळ्यांचे किट देताना डॉ. नितीन मोदी व ग्रामसेवक साळवी छायाचित्रात दिसत आहेत.
हे औषधं भारतीय आयुष मंत्रालयातर्फे सर्व भारतीयांना देण्याचे सुचविण्यात आले आहे. (देशान्तर्गत होमियोपॅथी व आयुर्वेदिक औषध शास्त्र सांभाळणारी हीं सौंस्था आहे)
यात पॉवरचे औषध सकाळी रिकाम्या पोटी एक मात्रा (5 गोळ्या) तीन दिवस घ्याव्या. ज्या भागात जास्त रुग्ण संख्या आहे तेथे 15 दिवसांनी रिपीट डोस घ्यावा. ज्याठिकाणी कमी रुग्ण संख्या नाही त्यांनी एक महिन्यांने डोस रिपीट करावे. एकंदरीत होमिओपॅथिक औषध हे अतिशय सुरक्षित आहे.
धनजीभाई मोदी मेडिकल फौंडेशन व गोका इंजिनियरींग च्या वतीने नियमित सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबीर, वैद्यकीय आरोग्य तपासणी, डोळे तपासणी शिबीर व अन्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या बद्दल वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, सणसवाडी सरपंच सुमिता नलावडे, दोन्ही ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ यांनी विशेष आभार मानले आहेत.