स्टेशनरी, स्नॅक्स, चायनीज, वडापाव, ज्वेलरी आणि कपड्याची दुकाने बंद, नियमांचे उलंघण केल्यास दंड
- नगराध्यक्षा योगिता चव्हाण
माणगांव, दि. ५ मे (उत्तम तांबे) :
माणगांव नगरपंचायत हद्दीतील सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरु असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील दुकानां व्यतिरिक्त स्टेशनरी, स्नॅक्स, चायनीज, वडापाव, ज्वेलरी आणि कपड्याची दुकाने पुढील आदेशा पर्यंत पूर्णतहा बंद ठेवावीत. तसेच नागरिकांनी तोंडाला मास्क न लावल्यास रुपये ५००/- दंड व सार्वजनिक ठिकाणी थूंकल्यास रुपये ५००/- दंड तसेच ग्राहकांनी बाजारपेठेत दुकानांत खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्यास संबधित दुकानदाराकडून रुपये १००० /- दंड तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी जाहीर सूचना वजा आवाहन नगरपंचायत प्रशासना तर्फे येथील नागरिकांना करण्यात आले असल्याची माहिती माणगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी दिली आहे.