पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी संकटात


लोणेरे (उदय चव्हाण) :
कोकणातील शेतकऱ्यांची शेती व्यवसायातील होणारी नैसर्गिक व कृत्रिम परवड काही त्याचा पिच्छा सोडत नाही. पावसाळ्यातील बेभरवशाच्या शेतीतील उत्पन्नापेक्षा येथील शेतकऱ्यांना उन्हाळी शेती खात्रीचे उत्पन्न मिळवून देत असते. परंतु त्यांच्या उदरनिर्वाहावर उठलेली ही कृत्रिम आपत्ती शेतकऱ्याला जिवघेणी ठरते. कालव्याची झालेली निकृष्ट दर्जाची कामे त्यामुळे कालव्याला ठिकठिकाणी असलेली गळती आणि पडलेलली गुरुळ यामुळे पाणी शेतीला पाहिजे तसं पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाने  चापडी ते उसरघर कालव्याला पाणी सोडणार, त्यासाठी चिंता करु नये, पाणी द्यायला आम्ही बांधील आहोत अशी खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसले आहे.


शेतकऱ्यांची पीक घेण्याची वेळ आली असताना मात्र शेतीला पाणीच पोहचत नसल्याने चापडी ते उसरघर  दरम्यानच्या परिसरात शेती करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत . एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करत असताना शेतकऱ्यांवर शेतीविणा  उपासमारीची वेळ  आली आहे. असं असताना मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे.  गेल्या पंचवीस दिवसापासून उसघर गावातील शेतीला पाणी पोहचत नाही. पाटबंधारे विभागाकडून कालव्यास  गळती असल्याने गुरुळ गेले आहे, त्याठिकाणी काम चालू असून लवकरच पाणी दिल जाईल असे ग्रामस्थांना अश्वासीत केले जाते. परंतु पाणी पंचवीस दिवसापासून शेतीला पोहचलेच नाही.आतापर्यंत  शेतीतून पीक घेण्याची वेळ आली असताना येथे मात्र  भातशेती सुकत चालली आहे. केवळ दोन-तीन दिवसात कलव्याला  पाणी सोडतो, असे  सांगणाऱ्या  पाठबंधारे प्रशासनाची अखेर लबाडी समोर आली आहे.  आता एप्रिल संपून मे महिना चालू झाला परंतु पिकलेली शेती पाण्यावाचून सुकण्याची  वेळ आली तरीही कालव्याला पाणी नाही ही शेतकऱ्यां समोर चिंतेची बाब आहे .
कालव्याचे  पाणी शेतीपर्यंत न पोहचण्याचं मुख्य कारण म्हणजे असे निदर्शनास येते की, कालव्याची झालेली निकृष्ट दर्जाची कामे असून  त्यामुळे कालव्याला ठिकठिकाणी असलेली गळती आणि पडलेलली गुरुळ यामुळे उसरघर, चापडी गावातील शेतीला पाहिजे तसं पाणी मिळत नाही यावर लवकरच उपाययोजना करावी अन्यथा पाठबंधारे विभागाने  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  द्यावी अशी मागणी चापडी व उसरघर येथील शेतकऱ्यांनी  केली आहे. 

Popular posts from this blog