बामणोली येथे २५ वर्षीय युवकाने साडीने लावून घेतला गळफास


माणगांव, दि. ८ मे (उत्तम तांबे) :
माणगांव तालुक्यातील बामणोली येथील एका २५ वर्षीय युवकाने साडीने गळफास लावून घेतला असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. १८/२०२० अशी नोंद करण्यात आली आहे.

हा गळफास नक्की का लावून घेतला, हे अजूनही समजलेले नसून बहूदा प्रेम अथवा नैराश्येच्या भावनेतून तो घेतला असावा. गळफास घेणारा तरुण हा येथील पंचक्रोशीत एक चांगला क्रिकेटपटू म्हणुन तरुण वर्गात सुपरिचीत होता. त्याच्या आकस्मिक दुर्दैवी मृत्यूमुळे त्याचे कुटुंबिय तसेच मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ७ मे २०२० रोजी सकाळी ०९ .०० वाजणेचे सुमारास मौजे बामणोली येथे रहात्या घरातील भालाला साडी बांधुन, त्या साडीचा फास करुन शैलेश दिनेश उभारे या पंचवीस वर्षीय युवकाने गळफास घेतल्याचे त्याचे वडिल हे शेतावर काम करुन घरी आले असता त्यांच्या निदर्शनास आल्याने, त्यांनी मयत शैलेश यास उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचारार्थ दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले आहे. अशी खबर फिर्यादी दिनेश महिपत उभारे (वय ५५) रा. बामणोली यांनी  माणगांव पोलीस ठाण्यात  दिल्यावरुन दि. ०७ /०५ /२०२० रोजी २२ . ३७ वाजता पोलीस हवालदार  पाटील/१४७८ यांनी तक्रार घेतली असून या घटनेचा  पुढील तपास सहाय्यक फौजदार सायगांवकर हे करीत आहेत.

Popular posts from this blog