खासदार सुनील तटकरे यांची वचनपूर्ती
खांब ते शिरवली रस्ताचे कारपेटचे काम मार्गी
रोहा (समीर बामुगडे) :
खासदार सुनील तटकरे यांच्या तसेच रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून व आ. अनिकेत तटकरे यांच्या विशेष मार्गदर्शनातून रोहे तालुक्यातील खांब ते शिरवली रस्त्याचे डांबरीकरणासह कारपेटचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्याने रहिवासी वर्गाला चांगलाच दिलासा प्राप्त झाला आहे.
कोकणचे भाग्यविधाते व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मागील दोन महिन्यापूर्वी शिरवली येथे मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी खांब ते शिरवली रस्त्याचे पक्के डांबरीकरण व कारपेटचे काम लवकरच मार्गी लावले जाईल. अशाप्रकारचे वचन ग्रामस्थांना दिले होते तर त्यांनी आपले वचन अल्पावधीतच पूर्ण करून वचनपूर्ती केल्याने रहिवासी वर्गाला चांगलाच दिलासा प्राप्त झाला आहे. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.युवक अध्यक्ष महेंद्र पोटफोडे व युवा नेते भाई पोटफोडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने सदरच्या रस्त्याचे पक्क्या डांबरीकरणासह कारपेटचे काम पूर्ण झाले असल्याने तटकरे परिवाराचे आम्ही सदैव त्रणी राहणार असल्याचे ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले आहे. तर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांचे शिरवली गावावर असलेल्या विशेष प्रेमाखातर आतापर्यंत गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली असून भविष्यातील विकासकामेही त्यांच्यामुळेच पुर्ण होतील अशा प्रकारचा आशावाद यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.