एकदंत क्रिएशन ग्रुपमधील मुला-मुलींतर्फे गरजू नागरिकांना धान्य वाटप
पेण (प्रतिनिधी) :
पेण तालुक्यातील एकदंत क्रिएशन ग्रुपमधील मुला-मुलींतर्फे गरजू नागरिकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच हातावर कमविणाऱ्या गरीब कुटूंबांकडे उत्पन्नाचे साधनच नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा प्रकारे अनेक गरीब कुटूंब आजदेखील हालाखीचे जीवन जगत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत 'एक हात मदतीचा' या उद्देशाने 'एकदंत क्रिएशन ग्रुप, पेण' या ग्रुपने गरीब व गरजू कुटूंबांना धान्य वाटप करण्यात आले.
एकदंत क्रिएशन ग्रुपमधील राजू कांबळे, तृप्ती म्हात्रे, गणेश म्हात्रे, कैस तांबोळी, काजल भोईर, आकाश मोकल, अजय पवार, विजय पवार, अमर घोबाले, अक्षय आर्या, यादव, अनुजा पाटील, राची पातेरे, नेहा भोईर, श्रृती बुरकूल यांनी पुढाकार घेऊन पेणमधील शंकरलाल भुटाजी अँड सन्स, जुहरमल रामचंद जैन, मे. केशव लक्ष्मण जोशी, स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी, आशा म्हात्रे (मुंबई पोलीस), काजल भोईर, कृपाली लिये, नितेश म्हात्रे, यांसारख्या दानशूर व्यक्तींकडून तांदूळ, हरभरे, गहू, डाळ, तेल, कांदे-बटाटे, बिस्कीट तसेच अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळवून ती गरीब व गरजू नागरिकांना वाटप करण्यात आली.
एकदंत क्रिएशन ग्रुपमधील मुला-मुलींच्या या स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.