प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोकण विभाग कार्याध्यक्ष पदावर पत्रकार समीर बामुगडे यांची निवड
रोहा (प्रतिनिधी) :
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभाग कार्याध्यक्ष पदावर पत्रकार समीर बामुगडे यांची निवड करण्यात आली आहे.
समीर बामुगडे हे गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत असून ते विविध वृत्तपत्रे, वेब न्यूज आणि न्यूज चॅनल्समध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक सामाजिक समस्या तसेच अन्यायाविरूद्ध निर्भिडपणे आवाज उठविलेला आहे. रोखठोक लिखाण व दमदार पत्रकारितेमुळे ते निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवाचा विचार करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.