भैरवनाथ मित्र मंडळ पाठरशेत यांच्या सहकार्याने चाकरमानी व मजुरांसाठी मोफत अन्नछत्र सेवा 


कोलाड (फिरोज सय्यद) :
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई व इतर ठिकाणचे चाकरमानी व मजुर शहरातील वाढत्या अडचणी लक्षात घेता आपापल्या गावी कोकणात मिळेल त्या वाहनात किंवा पायी प्रवास करत आहेत. या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यात त्यांना कुठल्याही प्रकारची जेवण सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेता पाठरशेत येथील मधुकर कोदे यांनी आपल्या स्वखर्चांने व भैरवनाथ मित्र मंडळ पाठरशेत यांच्या सहकार्याने कोलाड वरसगाव भिरा फाट्यावर चाकरमानी व मजुरांसाठी मोफत अन्नछत्र सेवा चालू केली आहे. त्याचबरोबर त्यांना थंड पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा दररोज स. 11 ते 03 या वेळेत लॉकडाऊन संपेपर्यंत ते चालू ठेवणार आहेत.

या कामी मधुकर कोदे यांना भैरवनाथ मित्र मंडळ पाठरशेत येथील विष्णू कोदे, दिपक काडगे, सचिदानंद साठे, मुकुंद कोदे, रामदास कोदे, विजय नाडकर, गुणाजी सालदुर, गजानन कोदे, प्रवीण कोदे, समीर कोदे, युवराज कोदे, गणपत नाडकर, भाई कोदे यांचे सहकार्य लाभत आहे. पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था भगीरथ जलगंगा, घनश्याम साठे (इंदापूर) व मयूर कोदे (पाठरशेत) यांच्याकडून करण्यात येत आहे .

या महामारीच्या काळात मधुकर कोदे यांनी उचललेली ही सामाजिक बांधिलकीची धुरा खरोखर अमूल्य आहे . त्यांच्या या उपक्रमाबद्दल पंचक्रोशीतूनही त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांंच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोशल डिस्टंसींगचा वापर करत हे कार्य चालू आहे.

Popular posts from this blog