🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हुतामाकी आणि पारले बिस्किट्स कंपनीवर कारवाई कधी? खालापूर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे तहसीलदारांना स्मरण पत्र


वावोशी (प्रतिभा शेवाळे) : खालापूर तालुक्यातील शिरवली विभागातील हुतामाकी प्रा. लि. कंपनी आणि पारले बिस्किट्स या दोन्ही कंपन्या कोरोना नामक घातक आणि जीवघेण्या भयंकर रोगाविषयी गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. या कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून सोशल डिस्टनसिंगला फाटा देऊन कामगारांची बसने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाकडून खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना या कंपन्यांना सरकारी नियमांचे पालन करीत नसून सोशल डिस्टनसिंगचेही उल्लंन करीत असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. परंतू आज या निवेदनास महिना व्हायला आला तरीही या कंपन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नसून याऊलट या कंपन्यांनी सरकारी नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. तरीही शासनाकडून या मुजोर कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी याकरिता खालापूर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाकडून पुन्हा एकदा खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना स्मरण पत्र देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजश्री जोगी, निवासी नायब तहसिलदार कल्याणी कदम, खालापूर पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष संतोष शेवाळे, राजू भंडारी सचिव आणि प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते.

Popular posts from this blog