टाटा पॉवर भिरा कंपनीकडून लॉगडाऊनचे नियम धाब्यावर 


पाटणूस (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील टाटा पॉवर भिरा कंपनीने लॉगडाभनची कारणे दाखवीत आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. कंपनीच्या गेटवरून कंपनीत अनेकांना प्रवेश नाकारला जात आहे. हे जरी खरे असले तरी प्रत्यक्ष कंपनी नाटक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हकीकत अशी की भिरा येथे अलिबागची रायगड बाजार ही संस्था कार्यरत आहे. या रायगड बाजारात देशमुख नावाचे एक कर्मचारी काम करतात. सदर देशमुख यांना कंपनीने कंपनीच्या धोबी चाळीत राहण्यासाठी रूम दिली आहे. तेथे ते आपल्या पत्नी सह राहतात. त्यांची मुलगी नोकरी निमित्त ठाणे दिवा येथे राहते. 23 मार्च रोजी लॉगडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांच्या मुलीला काही दिवसानंतर घरमालकिणीने घर खाली करण्यास सांगितले. तिच्या सोबत तिच्या आणखी तीन मैत्रिणी देखील होत्या. वाहतूक पूर्ण बंद असल्याने आपण गावी कसे जायचे असा पेच निर्माण झालेल्या मुलींनी गावी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मजल दर मजल करीत तीन रात्र, तीन दिवस चालत भिरा येथे पोहचली. तिच्या सोबतच्या मैत्रणी रत्नागिरी कडे रवाना झाल्या. सतत चालत राहिल्याने मुलीच्या पायात अजिबात त्राण नव्हते. मुलीला घरात येऊन जेमतेम एक तास झाला नसेल तोच ही बातमी टाटा कंपनीला समजली. बातमी समजताच टाटा कंपनीच्या व्यवस्थापकाने सुनील देशमुख नावाच्या कर्मचाऱ्यास मुलीच्या घरी पाठविले व मुलीच्या आई वडिलांसह घराबाहेर काढण्यास सांगितले. मुलगी गर्भगळीत झाल्याचे समोर पाहूनही सदर कर्मचारी त्यांना दम देत होता व त्यांना घराबाहेर निघण्यास सांगत होता. एक तासाच्या आत घर खाली करा अन्यथा तुमचे सामान घराबाहेर टाकावे लागेल अशी धमकी देत होता. त्या ठिकाणी वाद सुरू असताना आरोग्य सेविका ज्योती जाधव व आशा सेविका रेश्मा म्हामुणकर तेथे पोहचल्या. मुलीची अवस्था पाहून त्यांनाही तिची दया आली. म्हणून त्यांनी कर्मचारी सुनील देशमुख यांना विंनती केली की, त्यानी मुलीला व तिच्या आई वडिलांना घराबाहेर काढू नये. परंतु सुनील यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्याच वेळी पाटणूस कोरोना नियंत्रण कमिटी तेथे पोहचली त्यांनीही सदर कर्मचाऱ्यास विंनती केली. परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही. कमिटीने शेवटी विळे ग्रामपंचायतचे सरपंच गजानन मोहिते यांना फोन करून सदर कुटूंबाची व्यवस्था करण्याची विंनती केली. त्यांनीही कमिटीचा मान ठेवत विळे येथील राजिप शाळेत राहण्याची सोय केली. त्यांना तेथे सामनासह नेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यास गाडीची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी टाटा चे व्यवस्थपक गणेश देशमुख यांना फोन लावला परंतु त्यांनी गाडी देण्यास स्पष्ट नकार दिला. उलट हे काम ग्रामपंचायतीचे आहे त्यांनी व्यवस्था करावी असे सांगितले. शेवटी सदर कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीत बसून विले येथे सोडण्यात आले.
आम्ही कंपनीत आमच्याही माणसांना बाहेरून आल्यावर घेत नाही व इथूनही कुणाला बाहेर सोडत नाही असे मुलीला घरी सोडण्यास सांगायला आलेल्या सुनील देशमुख सांगितले. हे शब्द त्यांनाच अडचणीत आणण्यासारखी घटना त्याच दिवशी घडली. कारण त्याच दिवशी टाटा कंपनीचे एक कर्मचारी आपल्या परिवारासह टाटा कंपनीत दाखल झाले. त्यामुळे आम्ही आमच्याही माणसांना बाहेरून आल्यावर प्रवेश देत नाही ही थाप सुनील देशमुख यांच्या चांगलीच अंगलट आली. कारण सदरचा कर्मचारी जवळून नाही तर चक्क गुजरातवरून आला. त्यामुळे आपली फजिती झाल्याचे लक्षात येताच कंपनीने ही बाब गुप्त ठेवली. कारण गुजरात वरून आलेली फॅमिली 18 एप्रिल रोजी तर आणखी एक कर्मचारी आपल्या परिवारासह खोपोली वरून आला. ते एकूण तीन जण होते आणि हे सर्व जण 23  एप्रिलला आले. त्यांना ही कंपनीने सामावून घेतले. मात्र ही बाब गंभीर असल्याने कंपनी त कुजबुज सुरू झाली. मात्र टाटा कंपनीचे पाटणूसच्या सरपंच नीलिमा निगडे यांचे पती संजय निगडे यांचे सलोख्याचे सबंध असल्याने त्यांनी कंपनीला सावध केले व त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र देऊन तुमच्या कडे आलेल्या माणसांची माहिती द्या असे सांगितले. पाटणूस कोरोना कमिटीला जेव्हा ही बाब समजली तेव्हा आपले आता काही खरे नाही असे कंपनीने ग्रामपंचायतीला पत्र पाठवून कळविले की, आम्ही आमच्या डॉक्टरकडून आमच्या कर्मचाऱ्यांची मेडिकल केली आहे. परंतु तरीही पाटणूस कोरोना कमिटीने कंपनीच्या गेटवर जाऊन भेट दिली तेव्हा त्यांनी पुंन्हा एकदा खोटी उत्तरे दिली. आम्ही प्रशासकीय वैद्य कीय अधीकारी यांना फोन करून सांगितले की, आमच्या कडे बाहेरून आमचे कर्मचारी आले असून आम्ही त्यांची मेडिकल केली असून त्यांना 14 दिवस होऊन गेले आहेत. परंतु प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल आंबेतकर म्हणाले की मला त्यानीं दोनच माणसांची माहिती दिली कंपनीचा खोटारडेपणा अखेर बाहेर आला व वैद्यकीय आरोग्यसेवक खैर, आरोग्य सेविका ज्योती जाधव, आशासेविका रेश्मा म्हामुणकर यांनी कंपनीत जाऊन पशूबा कटारिया, किरण कटारिया, युवराज कटारिया, दिव्या कटारिया (गुजरात), स्मिता रांजणे, कृष्णा रांजणे, कौशल रांजणे  खोपोली यांना कोरनटाईन करून त्यांना शिक्के मारण्यात आले. दरम्यान, सरपंच नीलिमा निगडे यांनी वेळीच दखल न घेता कंपनीच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहे.

Popular posts from this blog