रिक्षा चालक-मालक आर्थिक संकटात, संघटनेतर्फे रिक्षा बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकेजचे वाटप 


माणगांव (उत्तम तांबे) :
जगभरामध्ये कोरोना या साथीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमिवर भारत देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता संपूर्ण देशामध्ये ३ मार्चपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत.


अशा परिस्थितीमध्ये दररोज आपल्या कुटूंबाचा उदारनिर्वाह करणारे रिक्षा चालक-मालक आर्थिक संकटात पडले आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व्हावे असे रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे प्रयोजन करण्यात आले आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती महोत्सवा निमीत्ताने रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे आर्थिक फंडातील निधी उपलब्ध करून तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा साबळे व त्यांचे सहकारी मित्र दानशूर वजीर अहमद उभारे तसेच इंदापूर उपसरपंच तथा माणगाव तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष उदय अधिकारी या दानशूरांनी अडीच लाख रुपये उपलब्ध करून गोरगरीब, कष्टकरी कामगार गरजवंताना तसेच आर्थिक संकटात असलेल्या रिक्षाबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे अकराशे पॅकेजचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


यावेळी माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले, वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल येलवे, रावसाहेब कोळेकर, निवास साबळे व त्यांचे सहकारी तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेचे सल्लागार नरेश सावंत, विभागीय अध्यक्ष नामदेव खराडे, पराग सावंत, विजय पडवळ, सल्लागार राजेश बक्कम, इमरान आकूस, सचिव नंदू खरे, प्रकाश मोरे, खजिनदार विलास वेदक, दिनेश महाडीक, निलेश कडू, हुसेनमिया वजगरे, अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Popular posts from this blog