श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोशिएशनतर्फे पनवेल परिसरातील महिला रिक्षाचालकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल (प्रतिनिधी) :
सध्या देशात कोरोना आजारामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाले आहे. हे लॉकडाऊन येत्या ३ मे पर्यंत वाढवण्यात आले असल्याने ज्या लोकांचे हातावर पोट आहे व ज्यांची आर्थिक क्षमता कमकुवत अशा लोकांचे भूक व उपासमारीने हाल झाले आहेत. यामध्ये पनवेल तालुक्यात रिक्षा चालवणाऱ्या महिला रिक्षाचालक देखील चिंताग्रस्त आहेत. अशा महिला रिक्षाचालकांना आपल्या रिक्षाचे मेंटेनन्स, कर्जाचा हफ्ता व घर सांभाळणे या लॉकडाऊन काळामध्ये कठीण झाले आहे. अशा महिला रिक्षाचालकांना पत्रकार मित्र असोशिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टच्या वतीने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पत्रकार मित्र असोशिएशनचे सचिव व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अॅड. मनोहर सचदेव यांनी स्वखर्चाने या महिला रिक्षाचालकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला. यावेळी पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, पत्रकार संजय कदम, निलेश सोनावणे, विवेक पाटील, मंदार दोंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे प्रसिद्धीप्रमुख संतोष आमले, श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष उमेश सचदेव, सेक्रेटरी मनोज देढिया, खजिनदार गोपाळ गिडवानी उपस्थित होते. यावेळी महिला रिक्षाचालकांनी पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक व पत्रकार मित्र असोशिएशनचे सचिव श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अॅड. मनोहर सचदेव यांचे आभार मानले.