गडब रहिवाशी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १५ हजारांची मदत
पेण शहर (प्रशांत पोतदार) :
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी व रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड -१९) मदत करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील गडब येथील गडब रहिवाशी संघटनेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रू. १५००० (एन.इफ.टी.) मदत केली. ही मदत तहसीलदार यांच्या कडे देण्यात आली. यावेळी अध्यक्ष एल. के. म्हात्रे, प्रकाश भोईर, रामचंद्र म्हात्रे, कमलेश ठाकूर व मोहन कोठेकर हे उपस्थित होते.
