महाड, पोलादपुर, माणगांवचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला ६५० विक्रम रिक्षा चालकांना मदतीचा हात



माणगांव (प्रतिनिधी) : 
कोरोना पार्श्वभुमीवर लॉकडाऊन काळात महाड, पोलादपूर तालुक्यातील सुमारे ६५० मिनिडोर रिक्षा चालकांना महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
महाड, पोलादपुर, माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसेच तऴागाऴातील प्रत्येक नागरिकाशी त्यांची समाजसेवेची नाऴ जोडली गेली आहे. कोरोना काऴच काय, मतदारसंघातीलच सोडा... कुठूनही रात्री कुठल्याही कौटुंबिक आपत्तीस सापडलेल्या नागरिकाला भरतशेठ भेटले आणि त्याचा प्रश्न सुटला नाही अशी गोष्ट घडणे म्हणजे अशक्यच... ऱायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड तालुक्यातील आमदार गोगावले म्हणजेच लोकांसाठी, गोरगरीबांसाठी धावणारा, वेऴो वेऴी मदत करणारा म्हणून गरीबांचे शेठ भरतशेठ असे उद्गार महाड पोलादपुरकरांचे असतात.! आणि आमदार सत्यतेत ते उतरवतात देखील.


अशाच समाजकार्याचा भाग म्हणून तालुक्याचे प्रथम नागरिकाचे कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम लॉकडाऊनमुऴे ठप्प पडलेल्या विक्रम रिक्षा प्रवासी वाहतूक चालकांच्या कुटूंबांना आधार म्हणुन या जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, संपर्क प्रमुख विजय आप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, महाड नगरपरिषद विरोधी पक्ष नेते विवेक (बंटी) पोटफोडे, शहर प्रमुख नितीन पावले, सिद्धेश पाटेकर, महाड-पोलादपूर रिक्षा संघटना तालुका अध्यक्ष शेखर राखाडे, इत्यादी उपस्थित होते. समाजाचे उत्तरदायित्व म्हणून हे कार्य करत असल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले. यावेऴी महाड तालुका विक्रम रिक्षा संघटनेकडून आमदारांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

Popular posts from this blog