मुक्या प्राण्यांची काळजी घ्या पेणमध्ये प्राणी मित्रांकडून आवाहन 


लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही मुक्या प्राण्याला वैद्यकीय मदत लागल्यास सज्ज - सिमा पुनमीया 


पेण शहर (प्रशांत पोतदार) :
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी देश पातळी वर उपाय योजना करण्यात येत आहेत. सर्व शासकीय यंत्रणा संसर्ग रोखण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन व संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे. परंतु लॉक डाउन व संचार बंदी मध्ये मुक्या प्राण्यांच्या खाण्याचा तसेच प्राणी पक्षांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.लॉक डाउन मुळे मुळे सर्वत्र शुक शुकाट झालेला आहे.अन्न व खाद्य पदार्थांची दुकाने,हॉटेल्स बंद असल्याने कचऱ्यात तसेच उकिरड्यावर पडलेले अन्नपदार्थ हि भटक्या प्राण्यांना मिळत नसल्याने तसेच एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चढत असल्याने प्राणी पक्षांचा अन्न व पाण्या वाचून तडफडून मृत्यू होण्याची शक्यता वाढली असल्याने मुक्या प्राणाची काळजी घेण्याचे आवाहन पेणमध्ये प्राणी मित्रांकडून तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग नागरिकांना होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे तशीच काळजी प्राण्यांची घेण्याची गरज असल्याने पेण मधील पंख फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा व संस्थापक सिमा पुनमीया व सदस्य गेले चार वर्षांपासून प्राणीरक्षा ग्रुप तर्फे मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत.तर लॉक डाउनमध्ये ही त्यांच्याकडून प्राणीमात्राची सेवा सुरूच आहे.

माणूस बोलू शकतो पण मुके प्राणी बोलू व सांगू शकत नाहीत म्हणून त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही मुक्या प्राण्यासाठी वैद्यकीय मदत लागल्यास आम्ही सज्ज आहोत.

       - सिमा पुनमीया,पंख फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्षा व संस्थापक, पेण 

Popular posts from this blog