मोर्बा ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व औषध फवारणी 



मोर्बा (प्रतिनिधी) :
'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. हद्दीतील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी माणगांव तालुक्यातील मोर्बा ग्रा. पं. तर्फे स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले असून औषध फवारणी देखील करण्यात येत आहे.

मोर्बा ग्रामपंचायतीमार्फत बोरले, बौद्धवाडी गाव, आदिवासीवाडी, तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रीती चेतन मोहिते व माजी सरपंच अमोल मोहिते अशोक मोहिते, चेतन मोहिते, संदेश कासारे, रंजित मोहिते, प्रविण पवार, मनोज मोहिते, नरेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे स्वच्छतेचे काम झाले आहे.

सध्या 'कोरोना' संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले असून नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. तसेच  महत्वाच्या कामाशिवाय कोणीही बाहेर फिरू नका, घरीच थांबा व सुरक्षित रहा, असे आवाहन मोर्बा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog